
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: प्रतिनिधी गडचिरोली व गोंदिया येथील नक्षलग्रस्त भागात सुरक्षा पथकात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृह विभागाने नुकतेच येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे यांना अंतरिम सुरक्षा सेवा पदक जाहीर केले.
यापूर्वी सन २०२१ साली पोलीस उपनिरीक्षक मोरे यांना राज्य शासनाचा ‘विशेष सेवा पदक व खडतर सेवा पदक’ अशी दोन पदके बहाल करण्यात आले होते. सन २०१८ ते २०२१ असे तीन वर्ष नक्षलग्रस्त भागात खडतर असलेली सेवा अत्यंत चोखपणे पार पाडली. याचीच केंद्रीय गृह विभागानेघेऊन त्यांना उपरोक्त असे दोन पदकाने सन्मानित करण्यात आले.
सध्या ते येथील पोलीस ठाण्याचे डीबी इन्चार्ज म्हणून कार्यरत असुन नुकताच झालेल्या रॉबरी विथ मर्डर चा गुन्हा तीन दिवसात उघड करून सहा आरोपीस अटक करण्यात पीएसआय मोरे व डीबी पथकाचा महत्त्वाचा वाटा आहे.
त्यांना मिळालेले पदक व त्यांनी केलेला गुन्हे उघड यामुळे त्यांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व शहरातील अनेक नागरिकांतून त्यांच्या या कार्याचे अभिनंदन केले जात