
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा येथील रहिवासी अशोक विठ्ठल राऊत (वय ६२ वर्ष) हे मागील दिड वर्षांपासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहेत. शैलेश पाल (वय २८ वर्ष) हे टीबी आजाराने ग्रस्त आहेत. धनू तिवाडे (वय ३३ वर्ष) हे पक्षघाताच्या आजाराने ग्रस्त आहेत.तर राजू सुरपाम (वय ३६ वर्ष) हे सिकलसेल आजाराने ग्रस्त आहेत. ह्या सगळ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने वैद्यकीय उपचार घेतांना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
तर उर्मीला साईनाथ तिवाडे (वय ३६ वर्ष) ह्या महीलेचा कॅन्सर आजाराने मृत्यू झाला आहे.
सदरची बाब मुडझा येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक हातभार लागावा म्हणून आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना मुडझा ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष अनिल तिवाडे, मुडझा ग्राम काॅंग्रेस कमेटीचे सचिव रमेश कावळे, सरपंच होनाजी नैताम, सोशल मीडिया प्रमुख अक्षय टेंभुर्णे, कोषाध्यक्ष चंद्रकांत अंबादे, हरीदास चुधरी, कृष्णराव यादव, राजू राऊत, रमेश उरकुडे, ईश्वर निशाने, दंबाजी बामणवाडे, गोपाल मोरांडे, मुकेश भैसारे, प्रज्वल चामकवार, अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष जगदीश आमले,जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, आवळगाव सेवा सहकारी संस्थेचे सदस्य किशोर राऊत, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके, युवक काँग्रेसचे प्रकाश खोब्रागडे, लक्ष्मण जिभकाटे हे यावेळी उपस्थित होते.