
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
पोषण आहार कामगारांनां किमान वेतन लागू करा- काॅ.जनार्दन काळे
शालेय पोषण आहार कामगारांचे आंदोलन गट शिक्षण अधिकारी कार्यलयावर काॅ.अर्जुन आडे,काॅ.गंगाधर गायकवाड,काॅ.जनार्दन काळे यांच्या नेत्तुत्वात संपन्न झाले.
शालेय पोषण आहार कामगरांना मानधनात वाढ करुण किमना वेतन देण्यात यावे, विना तक्रार कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये,भाजीपाला,इंधन,तेलाचे बिल थेट कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे,शालेय पोषण आहार कामगारांना आहार एवजी इतर कामे लाऊ नये,मानधन, इंधन,भाजीपाला,तेलाचे बिल दर महिण्याला वेळेत अदा करण्यात यावे, कामगार विरोधी कायदे वापस घेण्यात यावे इत्यादि मागण्या यावेळी आंदोलनच्या वतीने करण्यात आल्या. १५०० रूपयांच्या अंत्यंत तुटपुंज्या मानधनावर शालेय आहार कामगार काम करीत असुन कामगरांना कामाचा योग्य मोबदला मिळावा कामगारांना किमान वेतन द्या असे मत यावेळी आंदोलनाला संबोधित करत असतांना सीटु चे नेते काॅ.जनार्दन काळे यांनी केले.
कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करुन किमान जगण्यापुरते वेतन द्या अशी अग्राही मागणी सिटु चे जिल्हा सचिव काॅ.गंगाधर गायकवाड यांनी केली.आंदोलनास किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी पांठिबा दिला.
आंदोलनात दिलीप कोडापे,दत्ता सहाने,सोनाबाई भांगे,बंडु चव्हाण, मडावीबाई आदि शालेय पोषण आहार कामगार उपस्थित होते,प्रषासनाच्या वतीने मागण्या सदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन लेखी देण्यात आले.
कामगार एकजूट झिंदाबाद,कामगारांना किमान वेतन लागू करा, कामगार विरोधी कायदे वापस घ्या अशा गगणभेदी घोषनांणी आंदोलनाचे समारोप करण्यात आले.