
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या सहमतीने,काॅंग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांनी पक्षाची तालुका कार्यकारिणी सोमवारी ३० जानेवारी रोजी जाहीर केली आहे.इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आबासाहेब निंबाळकर यांनी सोमवारी ही निवड जाहीर केली आहे.यामध्ये तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले आहे.
त्यामध्ये इंदापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्षपदी राहूल आचरे, राहूल वीर वीर भावडी,नसीरभाई शेख लुमेवाडी, इंदापूर तालुका सरचिटणीस पदी उत्तम फाळके वरकुटे बुद्रूक, इंदापूर तालुका सचिव पदी दत्तात्रय देवकर यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
याबाबत बोलताना आबासाहेब निंबाळकर यांनी सांगितले की सदरची कार्यकारणी निवडताना तालुक्याच्या गावागावातील सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे. तर काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांचा या कार्यकारणी सामावेश करण्यात आला आहे.अजुनही इंदापूर तालुक्यातील जुने काॅंग्रेस विचारांचे पदाधिकारी आहेत यांना एकत्रित करून पुढील विस्तारित कार्यकारणी मध्ये त्यांचा समावेश करण्यात येणार आहे,असे आबासाहेब निंबाळकर यांनी म्हटले आहे.