
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार: तालुक्याची प्रमुख अर्थ वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले.या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. जव्हारमधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या बँकेचे मतदार हे जव्हार तालुक्यातील एकूण २ हजार १५४ आहेत.या निवडणूकीचे मतदान केंद्र हे जव्हार मधील ज्ञानगंगा हायस्कूल येथे ४ बूथचे आयोजन करून करण्यात आले होते.सकाळी ०८ ते दुपारी ०४ पर्यंतची मतदानची वेळ ठेवण्यात आली होती.एकूण १ हजार ५१० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे ७०.०० टक्के मतदान झाले.या निवडणुकीत १३ संचालकपदांसाठी एकूण ३० उमेदवार रिंगणात होते.त्यात २ अपक्ष तर जनसेवा व मर्चंट सहकार पॅनल यांच्यात थेट समोर लढत होती.या निवडणुकीची मतमोजणी ही मतदानच्या ठिकाणी त्याच दिवशी म्हणजेच रविवारी ०४:३० वाजता सुरू करण्यात आली असून मतमोजणी सायंकाळ पर्यंत सुरू होती.