
दैनिक चालु वार्ता भिवंडी -गुरुनाथ तिरपणकर
-विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत असते.त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी मिळाली ती नुकताच जि.प.केंद्रशाळा वेहेळे येथे आयोजित विज्ञान विज्ञान प्रदर्शनात. वेहेळे येथे हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.या प्रदर्शनास सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.१००पेक्षा अधिक प्रयोग या विज्ञान जत्रेत दाखविण्यात आले.इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या विज्ञान जत्रेत सहभाग घेतला.सदर प्रयोग जत्रेस माजी पं.स.सभापती मा.सौ.विद्याताई थळे त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांनीच विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पालकांनी देखील या विज्ञान जत्रेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळा पिंपळनेर येथील विद्यार्थी तसेच त्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक देखील या विज्ञान प्रदर्शनास उपस्थित राहुन विज्ञान प्रयोगांचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून मुख्याध्यापक सौ.निकवाडे मॅडम,सौ.ढाके मॅडम,सौ.संचला मॅडम,सौ.नमिता मॅडम,सौ.सुर्यवंशी मॅडम,सौ.माधुरी मॅडम,सौ.संजना मॅडम,सौ.छाया मॅडम,सौ.तारी मॅडम,श्री.मेश्राम सर या सर्वांच्या मार्गदर्शनातून ही विज्ञान जत्रा संपन्न झाली.