
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा कंधार मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील पारडी येथील आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात हजारो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला, यावेळी पारडी येथील ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात व भव्य आतिषबाजी करून आमदार शिंदे व आशाताई यांचे स्वागत केले, यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून शेतकरी, कष्टकरी, बहुजन, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा पक्ष सदैव कटिबध्द राहिलेला पक्ष आहे, सर्वसामान्य समाजाचा विकास व मतदार संघातील सर्व लोक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मतदार संघातील गावांचा विकास साध्य करण्याचा ध्यास बाळगून शेतकरी कामगार पक्ष काम करत असून आगामी काळातही लोहा कंधार मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध लोक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचे हित जोपासण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले ,यावेळी आशाताई शिंदे बोलताना म्हणाल्या की शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याचा संकल्प केला असून आगामी काळात मतदारसंघातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून व विविध शासनाच्या योजनेतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याचे यावेळी आशाताई शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले, लोहा कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये या अगोदरही जाहीर प्रवेश केलेला होता व अनेक गावातील हजारो कार्यकर्ते शेकाप मध्ये जाहीर प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे, यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण पा. डिकळे, उपसभापती श्याम अण्णा पवार, शेकापचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर, सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, सोन मांजरीचे सरपंच सखाराम लोंढे, गिरीश डिगोळे, कचरू बंडेवार, काबेगावचे सरपंच दुलेखा पठाण, मनोज भालेराव, शेकापचे तालुकाध्यक्ष नागेश खांबेगावकर, सुधाकर सातपुते, सचिन शिरसागर, वसंत मंगनाळे, सिद्धू वडजे, राहुल बोरगावकर ,अशोक बोधगिरे सह शेकापमध्ये नुकतेच प्रवेश केलेले शाखाध्यक्ष व्यंकटराव पा. पवार, उपाध्यक्ष माधव पा.डिकळे, माजी सरपंच दिगंबर पा.डिकळे, गणपत मोरवले, सूर्यकांत पवार, बालाजी डिकळे, लक्ष्मण डिकळे,सह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला, यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.