
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन सातोना परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा साठा पकडला. तथापि या कारवाईमुळे सेलू पोलीस मात्र पूरते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
परभणी-हिंगोली विभागीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने जे समजले ते असे की, काल रात्री उशीरा सेलू ते सातोना रोड दरम्यान मातोश्री हॉटेलच्या पश्चिमेस भरधाव वेगाने धावत जाणारा चार चाकी टेम्पो क्र.एम्.एच्.२२ एल्.१९१ ह्या लाल रंगाच्या टेंपोचा सिनेस्टाईल पाठलाग केला असता तो अशोक किशनराव घाडगे यांच्या पत्रा शेडला जबरी धडक देत अटकला. त्यामुळे चालक राधाकिशन पिराजी साळवे याने तो टेंपो तेथेच सोडून पोबारा केला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नसला तरी चार चाकी टेंपोसह अवैध दारुचा साठा मात्र जप्त करणे शक्य झाले. वाहनांची झडती घेतली त्यावेळी जाड पुठ्ठ्याचे १७ बॉक्समध्ये भिंगरी संत्रा, १८० मी.ली.क्षमतेच्या ८१६ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आतमध्ये मिळून आल्या.
पोबारा केलेल्या वाहन चालकास फरार घोषित करुन त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(ई) अन्वये गुन्ह्याची नोंद करुन वाहन व देशी दारुच्या तो साठा ताब्यात घेतला. त्याची एकूण किंमत ४ लाख ७ हजार १२० रुपये एवढी असल्याचे समजते.
नांदेड विभागीय उपायुक्त उषा वर्मा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे परभणी अधीक्षक रवीकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईचे नेतृत्व परभणी-हिंगोली राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालय निरीक्षकांनी केले. तथापि सेलू पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर मात्र पूरते संशयाचे कल्लोळ मंडारले जात आहेत.
या कारवाईत निरिक्षक जी.एल्.पुसे, दुय्यम निरिक्षक बी.एस्.मंडलवार, ओ.जे.सय्यद, जवान तथा वाहन चालक व्ही.जी.टेकाळे, बी.पी.कच्छवे आणि जवान आर्.ए.चौहान, आर.पी.साळवे, आर्.पी.बोईनवाड आदींचा सहभाग होता. पुढील तपास निरिक्षक जी.एल्.पुसे हे करीत असल्याचे समजते.