
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
जी .के .पी .शिवरस्ता मोशी येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण अधिकारी बलराज पाटील हे होते. रवींद्र आंबेकर यांनी महिला दिनाचा गौरवशाली इतिहास सांगून महिलांचा सेवा त्याग,व त्यांच्या कार्यास नमन केले .किशोर कुलकर्णी यांनी पण महिला दिनाच्या निमित्ताने उपयुक्त माहिती सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले .महिला दिनाच्या निमित्ताने सौ. दिपाली धनकुडे यांचा श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांच्या बालकासह भावपूर्ण सत्कार करून महिलाबाबतची कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास श्री कदम कुडे,वायकर ,पाटील, पंढरकर,पंडित ,बोराडे, तात्या ,पवार ,आदीसह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नवनीत सोनार यांनी केले