
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) : देशातील प्रत्येक क्षेत्रात सार्वजनिक महत्व अधोरेखित करण्याकरता दिनविशेष साजरे केल्या जातात त्या अनुषंगाने केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने यावर्षी प्रथमच देशाच्या राजधानी दिल्ली येथे ४ मार्च रोजी राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा केला त्यात राज्यातील नागपूर महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे व वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साहूर वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता अक्षय बनसोडे व तंत्रज्ञ महेंद्र गोमासे यांचा उत्कृष्टकार्य व कर्तव्यनिष्ठ म्हणून दिल्लीत सन्मान करण्यात आला त्यामुळे देशातील महाराष्ट्रात प्रथमच विद्युतकरण झालेल्या वर्धा जिल्ह्यात मानाचा तुरा कर्तव्यनिष्ठ अधिकारी व तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांमूळे प्राप्त झाला संपूर्ण कार्यरत शासकीय सार्वजनिक क्षेत्रातून विद्युत क्षेत्राने राष्ट्रीय पातळीवर वर्धा जिल्ह्याचे नाव स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव वर्षात महावितरण कंपनीच्या प्रतिनिधींनी सुवर्ण अक्षराने कोरले आहे त्याकारणे कर्तव्यदक्ष वीज वितरण अभियंता अक्षय बनसोडे व कर्तव्यदक्ष तंत्रज्ञ महेंद्र गोमासे यांच्यावर उच्च पातळीचा अभिनंदनचा वर्षाव होत आहे या सन्मानाकरता या दोन्ही प्रतिनिधींना महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अशोक सावंत कार्यकारी अभियंता दिलीप मोहाड, उपकार्यकारी अभियंता अमोल कुमार जयस्वाल यांचे सहकार्य लाभले आहे शाखा अभियंता अक्षय बनसोडे व तंत्रज्ञ महेंद्र गोमासे यांचे आष्टी तालुका बहुजन सोशल फोरम अध्यक्ष देवानंद डोळस, दै.जनप्रभात मुख्यसंपादक राहुल गजरे, माजी उपसरपंच ईश्वर गाडगे, प्रसिद्ध आंबेडकर विचारवंत कृष्णा हरले,श्याम शिर्के,से.नि.शिक्षक प्रकाश गायकवाड, रमेश मसरे, कार्यकारी संपादक अवधूत शेंद्रे,भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष
अतुल डोळस, कट्टर आंबेडकरवादी चंद्रशेखर चतुर, प्रा. मनीष काळपांडे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कठाणे, निरंजन वानखडे आदींनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे