
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: तालुक्यातील आनंदवाडी ते भारसवाडा राज्य मार्गावर अत्यंत जीवघेणे खड्डे पडलेले असून सरळ हा मार्ग यमदूत दरबारी पोहोचण्यासाठी आहे की लोकवस्तीत जाण्यासाठी? असा प्रश्न प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे याबाबत असे केले गेल्या २०१९ मध्ये आनंदवाडी भारसवाडा वर्गाचे मजबुतीकरण डांबरीकरण झाले आहे मात्र सर्वांच्या पहिल्या सहा महिन्यातच या मार्गावर जीवघेणे पडलेत पण रस्ता दुरुस्ती कंत्राटदाराला जाग आली नाही त्यात अनेक छोटे-मोठे अपघात घडलेत आणि यापुढेही दैनंदिन अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दखल घेऊन आनंदवाडी भारसवाडा मार्ग वाहतुक योग्य करावा अन्यथा येत्या पंधरा दिवसात आंदोलन उभे करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ता संजय देसाई यांच्यासह कृष्णा नांदणे ,प्रवीण चौधरी विशाल उभाड यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे