
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
बुलढाणा : दिनांक 5 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे पद्मपाणी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दिलीप तरकसे यांच्या वतीने चौदाव्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार सिद्धार्थ तायडे यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारीते बद्दल पद्मपाणि “राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार”2022-23 प्रशस्तीपत्र ,स्मृतीचिन्ह आणि संविधान प्रत पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक उद्योजक विजयराज बंब, बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे जिल्हाधिकारी बीड, नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक बीड, डॉ. सुरेश साबळे बीड, नवनाथ पोटभरे ,शेख जमीर गट विकास अधिकारी, खटोड प्रतिष्ठानचे गौतम खाटोडे, प्रतिष्ठित उद्योजक ,किसन तागडे सामाजिक कार्यकर्ते ,प्रा. केसकर, आदर्श तरकसे ,संस्थाचालक विक्रम बप्पा मुंडे, रत्नदीप कांबळे उद्योजक, संतोष मनुकर संपादक दैनिक लोकशा, संदीप बेंद्रे पत्रकार दै. मराठवाडा साथी , शेख कामरान पत्रकार किसान बीड , यांच्यासह महिला पुरुष मोठ्या प्रमाणात नाट्यगृहात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया दिवाण मॅडम यांनी केले. आदर्श शाळा, समाजसेवक, आदर्श शिक्षक, पत्रकार ,आदर्श संस्था, प्रशासकीय अधिकार अशा एकूण 49 व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राज्यस्तरीय पद्मपाणी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सिद्धार्थ तायडे यांचे मित्रमंडळी तथा गावकऱ्यासह समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे.