
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने कळंब येथील संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले केंद्रशासनाने दिनांक ४ मार्च हा लाईनमन दिन म्हणून जाहीर केले आहे , निमित्ताने कळंब वीज वितरण कार्यालयांतर्गत आपली सेवा बजाविणाऱ्या १५ विद्युत कर्मचाऱ्यांचा(लाईनमन) फेटा, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डी. के. कुलकर्णी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी. आर. घाडगे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, शिक्षक संघटनेचे अशोक शिंपले, प्राचार्य महादेव गपाट यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी लाईनमन (विद्युत कर्मी ) दलुचंद भागवत बोंदर(मुख्यतंत्रज्ञ ) धर्मेंद्र भीमराव जमादार (वरिष्ठ तंत्रज्ञ) अतुल चंद्रकांत कुलकर्णी (वरिष्ठ तंत्रज्ञ ) संतोष महारुद्र हंगे (वरिष्ठ तंत्रज्ञ ) तानाजी लक्ष्मण धैयवॎाड (वरिष्ठ तंत्रज्ञ ) नितीन राजकुमार नागरगोजे ( वरिष्ठ तंत्रज्ञ ) दत्तू कारकून शिंदे (वरिष्ठ तंत्रज्ञ) अशोक लिंबाजी कोल्हे (विद्युत सहाय्यक) देविदास बापूराव खंडागळे (तंत्रज्ञ) पुष्पा फुलचंद इंगळे (वरिष्ठ तंत्रज्ञ ) शिल्पा गोकुळ भांगे( विद्युत सहाय्यक) शेवता अशोक सोनवणे ( विद्युत सहाय्यक) सचिन रामभाऊ खबाले (सहाय्य कर्मचारी) सदाशिव चंद्रकांत मोगले( चालक ) व सेवानिवृत्त कर्मचारी विनायक दशरथ या सर्वांचा फेटा ,पुष्पहार ,श्रीफळ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला याप्रसंगी डी .के. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात लाईनमन जोखमीचे काम करतात त्यांच्याकडून कामास थोडा विलंब झाला की नागरिक तक्रार करतात परंतु एका बटनाने आपल्या घरात उजेड निर्माण होतो परंतु त्या पाठीमागे त्यांची मेहनत परिश्रम असते याचा विचार होत नाही असे सांगितले सुरेश टेकाळे यांनी केंद्र शासनाने उशिरा का होईना याची दखल घेतली आहे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकाचा हा सन्मान आहे असे नमूद केले अशोक शिंपले यांनी ज्येष्ठ नागरिक महासंघाने समाजातील योग्य घटकाचा सत्कार केला अशी भावना व्यक्त केली प्राचार्य महादेव गपाट. यांनी आपल्या काव्यपंक्तीतून लाईनमंच्या कार्याचा गौरव केला विनायक दशरथ यांनी त्यांच्या काळानुसार झालेले बदल व कामगारांच्या अडचणी व त्यांच्या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी लाईनमन दिनाच्या निमित्ताने आहाला आमच्यासाठी काम करणाऱ्या घटकांचा सत्कार करता आला याबद्दल आनंद व्यक्त केला कार्यक्रमात शिक्षक रमेश शिंदे यांनी फेटे बांधले प्रास्ताविक व सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी केले तर आभार बंडू आबा ताटे यांनी मानले.