
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
स्व. गणपतराव कथले युवक आघाडीकडून मूक बधीर विद्यार्थ्यांसोबत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने कथले चौक येथे गेली 38 वर्षापासून पारंपरिक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्यात येत आहे. यंदा देखील मोठ्या उत्साहात होळी हा सण साजरा करण्यात आला असून पारंपरिक वाद्य वाजवत शहरातुन मिरवणूक काढत रंगोत्सव साजरा करण्यात आला. तसेच संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालय येथील दिव्यांग मुलांसोबत रंगोत्सव साजरा करून या मुलांच्या आयुष्यात आनंदाचा रंग भरण्याचा प्रयत्न कथले आघाडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, सुशिल बलदोटा,राजेश तापडिया, गोविंद खंडेलवाल,भाऊसाहेब शिंदे,नितीन हारकर,ओंकार कुलकर्णी,यश सुराणा,नवनाथ पुरी,प्रकाश खामकर,सोमनाथ जगताप,धर्मराज पुरी,मनोज फल्ले ,युवराज शिंदे विश्वजित पुरी मुख्याध्यापक बालाजी जाधवर व कथले आघाडी सदस्य उपस्थित हो