
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:हरभरा (चना )या पिकाचे हमीभाव दरात खरेदी साठी तालुक्यातील चार केंद्र ना नाफेड ची परवानगी मिळाली आहे..
१. शहापूर नामदेव रेड्डी यांचे शेतकरी गट
२. बळेगाव चे विजय देशमुख यांचे पुर्वारेश्वर शेतकरी गट
३. दिंगाबर कौरवार यांचे फार्मर प्रोड्यूसर कंपनी
४. पबितवार यांचे दिनदयाळ अँग्री सेंटर
5.जयपाल जामखेडे यांचे तिरूपती फारमर प्रोडूसर ली. वन्नाळी.
तरी शेतकरी यांनी आपल्या कडे या वर्षी हरभरा विकण्यासाठी संबंधित केंद्र मध्ये नोंदणी आवश्यक आहे..
यासाठी सातबारा उतारा वर पेरा नोंद आवश्यक आहे.. यापूर्वी पिक पाहणी करून सातबारा वर पेरा लावुन घेतले नसले तर तलाठी स्तरावर नोंदणी करता येईल..
तलाठी कार्यालयात जाऊन पेरा नोंद करुन सातबारा होल्डींग आधार कार्ड व बँक पासबुक अशा कागदपत्रे सह नोंदणी संबंधित केंद्र वर नोंदणी करून घ्यावी..
नोंदणी निःशुल्क असणे अभिप्रेत आहे..
हेक्टरी १५ क्विंटल प्रमाणे शेतकरी चे हरभरा खरेदी केली जाणार आहे त्याप्रमाणे शेतीचे क्षेत्र चा पेरा नुसार खरेदी केली जाईल..
पुर्वारेश्वर शेतकरी गट चे नोंदणी केंद्र सिंधु कालेज समोर ..
दिंगाबर कौरवार यांचे केंद्र उदगीर रोडवर देगलूरकर आरा मशीन जवळ..
पबितवार यांचे नोंदणी साठी मंगनाळे यांचे मारोती मिठाई दुकान समोर सेंटर व नगरपालिका काम्पलेक्स निलमवार संकुल या ठिकाणी आहे.. व वन्नाळी येथे तिरूपती फारमर प्रोडूसर कंपनी सेंटर आहे.
खुल्या बाजारात दर कमी असल्याने शेतकरी यांनी आपल्या हरभरा ची विक्री यापैकी सोयीचे केंद्र वर करावी..