
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:दोन दिवसांपासून शिवा जनशक्ती पार्टी प्रमुख प्रा मनोहर धोंडे सर मुंबई येथे तळ ठोकून अनेकांच्या भेटी आज महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा शिवा संघटनेच्या मुळ व अनेक वर्षाची मागणी पुर्णत्वाकडे.
1996 पासुन शिवा संघटनेची महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ही मुळ मागणी होती त्यासाठी अनेक आंदोलने पाठपुरावा व मंत्रालयात अनेक मंत्र्यांन सोबत बैठकाही झाल्या .
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ सह विविध मागवण्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर दि.27 एप्रिल 2007 रोजी झालेल्या शिवा संघटनेच्या भव्य मेळाव्यात आर आर पाटील यांनी शिवा संघटनेच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री म्हणून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजुरीची घोषणा करतो असे प्रा मनोहर धोंडे यांना सांगितले, या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजुरीची घोषणा होणार हे माहिती असतांनाही कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून असलेल्या श्री विनय कोरे यांनी भाषण करतांना महामंडळ स्थापन करून 10-20 हजार लोन/कर्ज दिल्याने समाजाचे भले होत नसते असे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापने विरोधी प्रस्तावनेत भाषण केल्यामुळेच आर आर पाटील यांनी जाहीर करणार असलेले महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ त्या दिवशी जाहीर केले नाही.
त्यानंतर दि.24 मार्च 2008 रोजी शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या सोबत शिवा संघटनेच्या शिष्टमंडळाची शासकीय बैठक संपन्न झाली. या नंतरही अनेक वेळा पाठपुरावा सुरूच होता.
शिवा संघटनेच्या प्रयत्न पाठपुराव्यामुळे आधीच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास तत्वतः मंजुरी मिळालेली होती. त्यासाठी शिवा संघटना अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होती व महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास पहिल्या टप्प्यात 100 कोटी निधी देऊन महामंडळाची प्रत्यक्षात अमल बजावणी करावी अशी शिवा संघटनेची मागणी आहे व पुढेही राहील.
मागील दोन दिवसांपासून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ यासाठी शिवा जनशक्ती पक्ष प्रमुख, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना प्रा मनोहर धोंडे सर मुंबई येथे तळ ठोकून होते अखेर आज विधानसभेत उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली त्याबद्दल शिवा संघटनेच्या वतीने शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापनेमुळे वीरशैव लिंगायत समाजातील सुरक्षित बेरोजगार तरूणांना आर्थिक सहाय्य मिळून उद्योग व्यवसाय व स्वतः चे युनिक सुरू करण्यासाठी मोठी मदत होईल याच हेतुने व वीरशैव लिंगायत समाजाचा स्थर उंचावण्यासाठी शिवा संघटनेने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची मागणी लावून धरली होती.
आज जरी पुन्हा घोषणा करण्यात आलेली असली तरी प्रत्यक्ष निधी व महामंडळाच्या अंमल बजावनीसाठी वेळ लागणार आहे त्यामुळे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला निधी देऊन महामंडळाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशी शिवा संघटनेची मागणी आहे व यासाठी शिवा संघटनेचा पाठपुरावा कायम राहील….
शिवा संघटनेच्या मागणी पाठपुराव्यामुळे शासनाने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे तसेच शिवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख मनोहर धोंडे यांचे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाकडून सर्वच स्तरातून अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे.