
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
लातुर/अहमद्पुर: आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी मॉडेल इंग्लिश स्कूल महमदपूर ते “जागतिक महिला” दिन महिला पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की शाळेचा आधारस्तंभ असणाऱ्या महिला पालकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी आज जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत सर्व महिला पालकांना आमंत्रित करण्यात आले. महिला पालकांमधील वरिष्ठ महिला आदरणीय
सौ ढाकणे मॅडम शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ ठाकूर मॅडम पूर्वप्राथमिक विभाग प्रमुख सौ ज्योती मॅडम व इतर शिक्षकवृंद यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले शाळेचे
प्रा. वि.मुख्याध्यापक श्रीराम क्षीरसागर सर व मा. वि. मुख्याध्यापक श्री कुमठेकर सर यांनी सर्व महिला शिक्षकवृंद व महिला पालक यांना महिला दिनाच्या दिलेल्या शुभेच्छांनी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली
संपूर्ण गृह जिच ऋणी असत अशा त्या गृहिणीचा सन्मान करण त्यांच्या गुणांना मुक्त व्यासपीठ मिळवून देण हीच आजच्या कार्यक्रमाची ओळख असल्याकारणाने महिला पालकांसाठी अनेक खेळ, बॉल पासिंग, तळ्यात मळ्यात, संगीत खुर्ची अशा अनेक खेळांचे नियोजन करण्यात आले यासाठी सर्व महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला
विजेत्या महिलांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
सौ कृष्णापूरे मॅडम यांनी व सूत्रसंचालन सौ जाधव मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ ठाकुर मॅडम यांनी शाळेच्या पुढील नियोजनाबाबत चर्चा केली. व पुढील प्रवेशप्रक्रिया, बेसीक अभ्यासक्रम, पालकांच्या अडचणी यांबद्दल ही माहिती दिली.
” यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता :”अशा मांगल्यपूर्ण वातावरणात या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.