
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:-अहमदपूर ते नागपूर व पुढे सारनाथ बुद्धगया नालंदा राजगीर कपिल वस्तू नगरी लिंबूनि नेपाळ अशा जवळपास 25 ऐतिहासिक बौद्ध धम्म स्थळांना भेट देण्यासाठी आज दिनांक 10 रोजी 50 जणांची एक टीम रवाना होत असताना येथील युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी या यात्रेस पंचशील ध्वज देऊन यात्रे सर्वांना केले गेले अनेक वर्षापासून येथील तक्षशिला बुद्धविहाराचे परमपूज्य बनते महाविरोजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्म सहल अविरत चालू आहे या सहलीत जिल्हाभरातून धम्म बांधव सहभागी होतात आज एक ट्रॅव्हल्स भरून 18 दिवसाच्या धम्म यात्रेस उपासक उपासिका रवाने झाले ही यात्रा नागपूर सारनाथ, बुद्धगया, राजगीर, नालंदा ,वैशाली ,कुशीनगर ,कपिल वस्तू नगरी श्रावस्ती लखनऊ, दिल्ली ,आग्रा अजंठा ,आधी ठिकाणी जाणार आहे सुरुवातीला येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास युवक नेते डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले तसेच या यात्रेत जाणाऱ्या सर्व महिला व पुरुषांनी येथे पुष्प अर्पण केले यावेळेस पूज्य बनते महाविरोध हेरो यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या नेतृत्वाखाली ही धम्मयात्रा केल्या अनेक वर्षापासून चालू आहे हे विशेष यावेळी पत्रकार अजय भालेराव, सचिन बानटे, भीमराव कांबळे, आकाश पवार ,पठाण मोहम्मद ,सरकाळे नितीन आदींची प्रमुख उपस्थिती होती या यात्रेतून श्रद्धावान उपासक उपासिकांना बुद्धकालीन सर्व ऐतिहासिक स्थळाची माहिती देऊन ऐतिहासिक समृद्ध वारसा समाजाला दाखविण्याचा प्रयत्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे तथागताचा पवित्र धम्म जाणून घेण्यासाठी भविष्यात विशेषता युवक वर्गांनी अशा धम्म यात्रेत सहभागी व्हावे असे आग्रही प्रतिपादन युवक नेते डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले