
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्था र.नं.१३०३ या संस्थेच्या संचालक पदाकरीता गेल्या १०/१२ दिवसांपासून तालुक्यातील दिग्गज आप-आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निघाले होते.त्या निवडणुकीचा निकाल दि.०६ फेब्रुवारी सोमवारी रोजी झाला असून निवडणुकीत सहकार पॅनलचे वर्चस्व दिसून आले आहे.
सद्यपरिस्थितीत तालुक्यातील सहकाराच्या सहभागातून उभारलेले सहकारचे जिनींग अँड प्रेसिंग युनिट बंद असले तरी सहकार वर्चस्वाच्या या निवडणुकीमध्ये सहकार व परिवर्तन या दोन पॅनलमध्ये अटीतटीची लढत होती.संचालक पदाच्या १९ जागांच्या निवडणुकीत दोन्ही पॅनल मधील दिग्गज मंडळी एकमेकांविरोधात उभी ठाकली होती.त्यामुळे तालुक्यात चांगलेच महत्त्व आले होते.दोन्ही पॅनल ने मतदारांच्या गाठीभेटी घेऊन चांगलाच प्रचार रंगला होता.१९ संचालक मंडळाच्या निवडणुकीत वैयक्तिक मतदार संघातून ७,सहकारी संस्था मतदार संघातून ७,महीला मतदार संघातून २,इतर मागासवर्गीय मतदार संघातून १,भटक्या विमुक्त जाती मधून १,अनु.जाती/जमाती मधून १ असे उमेदवार निवडून द्यावयाचे होते.त्यामधे सहकार पॅनलचे ११ तर परिवर्तन पॅनल चे ८ उमेदवार निवडून आले.सहकार पॅनलचे १ उमेदवार वगळून सर्व उमेदवार निवडून आले.सेवा सहकारी संस्था मधून परिवर्तन पॅनलचे सर्व प्रतिनिधी निवडून आले असल्याने जिनिंग अँड प्रेसिंग वर आपले वर्चस्व रहावे यासाठी आणि निवडून येण्याकरीता उमेदवारांनी चांगलीच क्षेत्ररक्षण केले होते.
सदर मतदान मोजणी वेळी क्रॉस मतदान करणाऱ्यांची संख्या वाढलेली आढळली.एकूण १५९७ मतांपैकी १३७ मते अवैद्य ठरली.