
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली दि.10 शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या तळेगाव रांजणगाव सांडस गणातून विभाग प्रमुख पदी श्री भीमराव कुदळे यांची निवड करण्यात आली.
पक्ष वाढीसाठी व संघटना बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे श्री भीमराव कुदळे यांनी सांगितले. पक्षाशी कायम प्रामाणिक राहून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
यावेळेस तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम गिरमकर, रामा गिरमकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष सात्रस, भाऊसाहेब कोकडे, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.