
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील मौजे मरगळवाडी येथील अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन जात दोन अल्पवयीन मुलांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
मरगळवाडी येथील अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे जात असताना याच गावातील दोन मुले तिच्याजवळ आले आणि त्यांनी तुला तुझ्या मैत्रिणीने बोलावले आहे तू आमच्या सोबत चल असे म्हणून मुलीला घेऊन गेले.
व त्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
यानंतर या आरोपी मुलांनी तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे, असे म्हणत मुली सोबत बळजबरीने फोटो काढले.
या सगळा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलगी खूप घाबरली.यानंतर तिने घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार आपल्या आजीला सांगितला.
आजीने ऊसतोडी साठी गेलेल्या आपल्या मुलाला घडलेला प्रसंग सांगितला.
यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी ऊस तोडीच्या ठिकाणावरून थेट गंगाखेड पोलीस स्टेशन गाठून दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.