
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
भोकरदन तालुक्यातल्या चांदाई एक्को गावातील शेतात विहिरीचे काम सुरु असताना जेसीबी मशीनचा धक्का लागल्याने वडील आणि मुलगा विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत जगण शामराव इधाटे हे 57 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाले आहेत तर त्यांचा मुलगा रघुनाथ इधाटे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जगणं इधाटे यांच्या शेतात नवीन विहिरीचे काम सुरू असताना त्यांचा मुलगा आणि ते विहिरी जवळ उभे होते. यावेळी अचानक त्यांना काम करत असलेल्या जेसीबी मशीनचा धक्का लागला आणि ते दोघे ही विहिरीत पडले.
ही धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातल्या चांदाई एक्को गावातील शेतात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी विहरीकडे धाव घेऊन दोघांना बाहेर काढण्याचा प्रयन्त केला.
मात्र या घटनेत जगणं इधाटे यांचा मृत्यु झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी जालन्यातील खाजगी रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.