
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
::::::::::::::::::::::’:::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा हे पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा परिसरात मागील अनेक दिवसापासून चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,काल रात्री सावळी सदोबा येथील राहुल पेशवे यांच्या कापूस भरुन असलेल्या भाड्याच्या गोदाऊनचे स्वेटर तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्या कडून झाला,यासंदर्भात राहुल पेशवे यांनी पोलीस स्टेशन पारवा येथे तक्रार दाखल केली असून,पारवा पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून,मात्र मागील अनेक दिवसापासून चालू असलेल्या चोरीच्या घटनेमध्ये परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपावरील मोटार, स्टटर्स,पॅनल,केबल,शेती उपयोगी साहित्य,मोबाईल,व्यापाऱ्यांचे गोदाऊन,घरफोडी अशा अनेक चोरीच्या घटना घडत असतांना पोलीस प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत आहे, चोरीचे अनेक प्रकरण या परिसरामध्ये घडत असताना,पारवा पोलीस प्रशासनाकडून मात्र अशा प्रकरणाचा तपास शांत गतीने होताना दिसतोय,त्यामुळेच चोरी करण्याची चांगलीच हिम्मत वाढलेली आहे,किंवा अशा चोरीच्या घटनांमध्ये चोरांना पोलिसांचे पाठबळ मिळत तर नाही ना अशी पण चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे, खाकी वर्दी वरून नागरिकांचा कुठेतरी विश्वास उडाल्यासारखा दिसतोय,त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर प्रकरणाकडे लक्ष घालण्याची गरज आहे,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहेत,