दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली दि. 19 श्री क्षेत्र तुळापूर (तालुका हवेली ) येथे पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती, श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या 334 व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त मंगळवारी ( दि 21) शासकीय पूजा व मानवंदने सह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी छत्रपती संभाजी राजांचा पूजाभिषेक त्यानंतर मुखपद यात्रा होईल. सकाळी नऊ वाजता साखळ दंडाचे पूजन व लातूर येथील शाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाडा चा कार्यक्रम होईल. तर शिवव्याख्यातांचे शिव व्याख्यान होईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता पोलीस दलाकडून शासकीय मानवंदना देण्यात येईल. सकाळी अकरा वाजता श्री क्षेत्र पुरंदर ते श्रीक्षेत्र तुळापूर या श्री संभाजी महाराज पालखीचे आगमन व स्वागत होईल. व दुपारी एक वाजता सर्व शंभू भक्तांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात येईल. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात होईल.
