
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर/माढा:दि.१८/३/२०२३ रोजी वरवडे ता. माढा येथे झालेल्या अपघातामध्ये टिळक रोड, टेंभुर्णी येथील रहिवासी श्री. अनिल मळसिद्ध स्वामी (आप्पा) रा.टिळक रोड टेंभुर्णी हे त्यांच्या स्वतःच्या टमटम गाडी मधून कुटुंबासह उपजीविकेसाठी बाजार करण्यासाठी प्रवास करीत असताना करमाळा रोड अकोले येथे त्यांचा अपघात झाला. सदर अपघातामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अकलूज येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तसं पाहिलं तर त्यांची परिस्थिती खूप हलकीची आहे. पत्नीची प्रकृती खूप चिंताजनक व गंभीर असल्याने ऑपरेशन करणे गरजेचे आहे, सदर ऑपरेशन साठी खूप मोठा खर्च येणार असल्याने अशा संकटाच्या वेळी नरसिंह प्रतिष्ठान, नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्याकडून यांच्याकडून ११,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. परंतु त्यांच्याकडे टमटम वाहन चालवून जगण्याशिवाय इतर कोणतेही उपजीविकेचे साधन नाही.त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना आपल्या सर्वांच्या मदतीची अत्यंत गरज आहे तरी आपल्या इच्छेने खालील फोन पे व गुगल पे नंबर वर मदत करावी असे नरसिंह प्रतिष्ठान व टिळक रोड गणेश मंडळ यांच्या वतीने आपणास विनंती आहे .
फोन पे व गुगल पे नंबर
९४०४६९०३८९
युवराज शिंदे (गुरुजी)