
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
नांदेड दक्षिण भागामध्ये असलेल्या सोनखेड ता. लोहा जिल्हा नांदेड येथे दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 30 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी होते त्याच अनुषंगाने 132 व्या जयंतीच्या अनुषंगाने दिनांक 20 मार्च 2023 रोज सोमवार रोजी कार्यकारणी आढावा बैठक पार पडली या बैठकीला सर्व बौद्ध उपासक व उपासिकांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती यावेळी सर्वांनुमते जयंतीच्या कार्यकारिणीचा ठराव मांडण्यात आला यामध्ये सार्वजनिक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खिल्लारे, उपाध्यक्ष शंकर धुतराज, सचिव रतन भोरगे, कोषाध्यक्ष तुकाराम खिल्लारे, सहसचिव मोतीराम धुतराज, प्रसिद्धीप्रमुख अमोल खिल्लारे(City News Live) सहकोषाध्यक्ष मिलिंद धुतराज सल्लागार :मधुकर धुतराज,मोहन धुतराज सुभाष खिल्लारे, मंगल जोंधळे,एकनाथ सूर्यवंशी, गौतम खिल्लारे राजेश खिल्लारे यांची निवड करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारावरती आपण चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या दिशादर्शक मार्गाचे अवलंबन केले पाहिजे असा ठराव यावेळी बैठकीमध्ये सर्वांनूमते निवड करण्यात आली.