
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दावणे
मंठा तालुक्यातील तळणी येथे रविवारी (ता. १९) हिंगलाज माता जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त भावसार समाजाच्या वतीने हिंगलाज मातेच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात जगन्नाथ भावसार म्हणाले की, सर्व समाजबांधवांनी किरकोळ वाद विसरून एकत्रित यावे. आपल्याकडे समाज मंदिरात जागा उपलब्ध असून समाज मंदिराचे बांधकामाबाबत पावले उचलावीत, ज्याचा उपयोग सामाजिक कार्य, लग्नकार्य व प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी होईल.
कार्यक्रमास शिवराज भावसार, विनोद भावसार, प्रकाश भावसार,शिवाजी भावसार, रवींद्र भावसार, वैभव भावसार, भगवान भावसार, भागवत भावसार, दीपक भावसार, गणेश भावसार, रमेश भावसार तसेच हिंगलाज माता मंडळाच्या गोदावरी भावसार, सुवर्णा भावसार, हिराबाई भावसार, वर्षा भावसार, वैशाली भावसार, अर्चना भावसार, प्रतिभा भावसार, कोमल भावसार आदींची उपस्थिती होती.
यावेळी हिंगलाज माता महिला मंडळाच्या वतीने महिला करिता विविध उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. त्यात शिलाई काम प्रशिक्षण, विविध खाद्यपदार्थ बनविण्याची प्रशिक्षण असे छोटे उद्योग उभारण्याकरिता ज्यातून महिला स्वावलंबी होतील असे उपक्रम घेण्याचा संकल्प करण्यात आला.