
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी – समीर मुल्ला
येथील कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार , कळंब येथील आदर्श शेतकरी “लिंबराज( नाना ) विठ्ठलराव चोंदे” यांना जाहीर करण्यात आला आहे.
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, या पूर्वी नामदेवराव माकोडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.या वर्षी आदर्श शेतकरी, धार्मिक , सामाजिक कामात अग्रेसर असणारे लिंबराज नाना चोंदे यांना जाहीर करण्यात आला असून, लवकरच पत्रकार संघाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.