
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): काल गुजरात येथील सुरत न्यायालयाने काँगेस नेते खा.राहुल गांधी यांना दोन वर्ष सजा सूनावून न्यायालयाने अवघ्या काही तासात जमानत दिली असता लोकसभा सचिवालयाने खा.राहुल गांधी यांची सूडबुद्धीने खासदारकी रद्द केली त्या निषेधार्थ आष्टी तालुका कांग्रेस पक्षाच्या वतीने आज आष्टी येथील बसस्थानकासमोरील महामार्गावर धरणे आंदोलन करण्यात आले यात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या त्यात मोदी सरकारच करायचा काय ? खाली डोक वरती पाय,मोदी सरकार, हाय,हाय,केंद्र सरकारचा निषेध असो,मोदी हटाव,संविधान बचाव आदी घोषणा आंदोलन कर्त्याकडून देण्यात आल्या यावेळी आष्टी पोलिसांनी ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांच्या आदेशावरून आंदोलन कर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले यावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती धरणे आंदोलनात नगराध्यक्ष अनिल धोत्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. अरुण बाजारे, तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा गंजीवाले,संजय शिरभाते, सरपंच दिलीप भाकरे (धाडी) माजी पं.स. सदस्य ईश्वर वरकड, मनोहर येनुरकर,नरेंद्र मोकदम, सुरेंद्र गायकवाड,ज्ञानेश्वर जमालपुरे,युवराज राऊत,जितेंद्र शेटे,गटनेता राहुल लाड,नगरसेवक योगेंद्र पोकळे,न.पं सभापती गौंज खा,याकूब खा, मुमताज अहेमद,हमीद भाई, इरफान कुरेशी,विपिन उमाळे, उमेश पोहणे,बबलू हसन,दिनेश
सावरकर,सादिक शहा,अज्जू बेग,नंदू सुरपाम, नितेश चातुरकर नागोराव खोडे,राहुल देशमुख, दिलीप पोकळे,सोनू मानिकपुरे,किशोर कुंभरे,रमेश कडताई,सिराज अहेमद, ऐनोदीन काजी,मोहन चातुरकर,दीपक एकोतखाणे, चंद्रशेखर तायवाडे उपसरपंच संदीप परतेती,मंगेश मतले, पंजाबराव मरापे, मनोहर धुर्वे, फईम भाई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते