
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी:- किरण गजभारे
“मॉल मध्ये उजेड आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात नेण्याचे कट कारस्थान
धर्माबाद शहरातील मुख्य रस्त्यावरील असलेल्या जि.प. कन्याशाळेच्या हद्दीत विद्युत विभागाने दोनशे व्होल्टची डिपी बसविण्याची उठाठेव सुरु केली असुन या धोकादायक डिपी मुळे गोरगरीब जनतेच्या लेकरांनासाठीच उरलेल्या कन्या शाळेस दोनशे टक्के धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या रिलायन्सच्या मॉल मध्ये या डिपीने उजेड आणण्याचा प्रयत्न होत असला तरी भविष्यात या प्रकारामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांचे भविष्य मात्र अंधारात नेण्याचे कट कारस्थान या मॉल च्या व मॉलच्या घर मालका कडुन होत असल्याचे पालका कडुन बोलले जात आहे.
या बाबत सविस्तरवृत्त असे कि, धर्माबाद शहरातील एक नामवंत व्यापा-याने आपल्या जागेवर एका मोठी अशी वास्तू तयार करुन एका कंपनीस भाडे तत्वावर शाॅपिंग मॉलसाठी दिली. शाॅपिंग मॉल ला जवळपास १०० होल्टचे लाईट सप्लाई लागते तरी काही अंतरावर असलेले शाॅपिंग मॉल ला लाईट पुरवठा करण्यात साठी आपल्या ला लागत असलेल्या २०० वोल्टची डिपी बसविण्यासाठी विद्युत वितरण कंपनी कडे रितसर परवानगी घेतली. खरी परंतु सदरिल डिपी कोण्या जागेवर बसवावी हे त्या व्यापा-याचे वैयक्तिक बाब असुन या व्यापा-याने हि डिपी सुरुवातीस गुपचुप बसविण्याचा घाट घातला तदनंतर तक्रार झाली तक्रारी नंतर नगर परिषदेची आर्धवट परवानगी घेतल्याचे सोंग केले. शेवटी काहीच जमत नसल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषद कन्या शाळेच्या जागेवर सदरिल वादग्रस्त डिपी हलविण्याचा घाट या व्यापा-याने घालुन डिपी बसविण्याचे काम सुरु केले होते. परंतु शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य भगवान कांबळे यांनी या विना परवाना डिपीच्या कामाला कडाडुन विरोध करुन सदरिल विनापरवाना वादग्रस्त काम थांबविल्याचे खात्री लायक वृत्त आहे.
या डिपी बसविण्या मागे कोणाचे वरद हस्त आहे हे कळने अवघड झाले असुन महावितरणाच्या खिशात तिन लाख रुपयाची रक्कम कोटेशनच्या नावाने जमा झाली म्हणजे शाळेतील गोरगरिब विद्यार्थ्यंच्या जिवाची किंमत शुन्य झाली का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करित आहे. डिपी बसविण्यासाठी जागा सुरक्षीत आहे का? जागे बाबत परवानगी आहे का? या ठिकाणी डिपी बसविण्यात आल्यास कोणास धोका होणार नाही का? असा विचार महावितरणा विभागास का पडला नाही. चार भिंतीत बसुन परवानगी देणे हे महावितरणास शोभते का असा सवाल परिसराच्या नागरिकांना पडला आहे.
एकंदरित सदरिल डिपी जिपच्या जागेत बसवु नये अन्यथा या प्रकारावर योग्य तो गुन्हा दाखल करु असे भगवान कांबळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगीतले.
ग्राहकास कोटेशन भरून घेऊन घेतले आहे ग्राहकांनी विद्युत ट्रान्सफॉर्मर डि पी हे कोणत्या जागी बसवावे त्या जागेच्या मालकाची परवानगी घेणे हा त्यांचा प्रश्न ग्राहकाचा आहे आमचा नाही:- प्रणय काळे सहाय्यक अभियंता विद्युत वितरण कंपनी धर्माबाद
नगर परिषदेच्या वतीने डि पी स्थलांतरित करण्यासाठी कसलीही परवानगी दिली नाही संबंधित व्यक्ती ने ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी चा अर्ज केला होता ट्रान्सफॉर्मर बदलण्याची परवानगी दिली आहे :- निलम कांबळे मुख्याधिकारी नगर परिषद धर्माबाद