
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रवेशद्वारा समोरचे जागेत उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे कार्याध्यक्ष अशोक मोरे व त्यांचे सहकारी गणेश रोंघे यांच्यासह अनेकांनी आपले समर्थन जाहीर केले आहे.
हे आमरण उपोषण दि.९ एप्रिल सकाळी ११:३० वाजता पासून सुरू करण्यात आले.या उपोषणा संदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ.वारे यांनी दिलेल्या पत्रानुसार या रुग्णालयाच्या कामासाठी जे जुने मोडकळीस आलेली कर्मचारी निवास स्थाने पाडण्यास अधिक्षक,अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ अमरावती यांची ना हरकत प्रमाणपत्र मिळताच हे काम सुरू होईल असे पत्र दिले आहे.परंतु फक्त इमारत बांधकाम सुरू करणे बरोबरच ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत.ही पदे त्वरित भरावे,नवजात बालकांसाठी सुरक्षा कक्ष,रक्तपेढी,प्रयोगशाळा,तज्ञ सोनोग्राफी इत्यादी सुविधा पुर्ततेच्या मागणीचा समावेश आहे.त्यामुळे या सर्व मागण्यांची पूर्तता करावी यासाठी सुरू असलेले आमरण उपोषणाचा विचार व्हावा अशी मागणी आहे.उपोषण मंडपाला बऱ्याच पक्ष,सामाजिक संघटनांचा पाठींबा असून यांच्यासह अनेकांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.