
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोना या गावात बौद्ध उपासक बाळा आठवले यांच्या संकल्पनेतून चिंचोना येथे बुद्धवन विपश्यना केंद्र पर्यटन निर्माण करण्यात आले.याचे बोधीसत्व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि.८ एप्रिल २०२३ ला या बुद्धवन भूमी येथे प्रा.सुजाता आठवले यांनी यांनी धम्मदानुतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आ.बळवंत वानखेडे,सामाजिक कार्यकर्ते कैलास गावंडे,पुरुषोत्तम घोगरे,सरपंच विपीन अनोकार,प्रमोद दाळू,प्रा.सुजाता आठवले,प्रा.इंदीरा आठवले,तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे,सामाजिक वनीकरण आरएफओ सत्यफुला सोळंके,गटविकास अधिकारी विनोद खेडकर,सुनिल गवई,भाऊराव वानखडे,संजय चौरपगार,राजीव जाधव,रमेश सावळे,प्रविण पेटकर यांच्या व पुजनिय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या बुद्धवन विपश्यना केंद्र,भूमीतून पाच दिवसापासून बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार भिक्षु संघ अंजनगाव तालुक्यातील गावामध्ये जावून संविधान जनजागृती व धम्मचेतना अभियान राबविण्यात आले.बुध्दवन विपश्यना केंद्राला जमीन देणारे धम्म दानदाते नरेश शिंगाडे तसेच इतर धम्म दानदाते उपस्थित होते.
बुद्धवन विपश्यना केंद्र नगरी सातपुड्याच्या कुशीत स्थापन झाली असून ही अमरावती जिल्ह्यात महत्त्वाची पर्यटन स्थळ म्हणून उदयास यावी अशी संकल्पना अध्यक्ष बाळा आठवले यांनी यावेळी सांगितले.
या बुद्धवन स्थळावर आपल्या बौद्ध धर्मातील लहान मुलावर चांगले संस्कार केंद्र बनले पाहिजे.तथागताच्या शांतीचा मार्गात्यातून राष्ट्राकडे चांगली वाटचाल होईल.असे प्रशिक्षण त्या बालकांना दिल्या जाईल असे प्रयत्न करावे असे मत प्रा.इंदिरा आठवले सामाजिक कार्यकर्त्यां यांनी आपल्या वाणीतून सांगितले.तसेच आ.बळवंत वानखडे यांनी सांगितले की,मी माझ्या निधीचा तसेच या भूमीसाठी माझ्या परीने जेवढे प्रयत्न होईल हे प्रयत्न करेल,असे लोकार्पण व उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले.बुध्दवन विपश्यना केंद्राच्या समिती तर्फे जाहीर करण्यात आले की,येथे जे बौद्ध धर्माच्या सामाजिक चळवळीमध्ये आहेत त्यांनी या बुद्धवन तसेच आज या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण झाले तसेच या ठिकाणी पंचवीस फुटांची तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन केल्या जाईल.त्यासाठी काही दानदात्यांनी आपले चेक या समितीकडे दिले तसेच ज्या दानशूर दानदात्यांनी येथे दान दिले त्यांचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
अंजनगाव तालुक्यातील बुद्धवन या भूमीला चांगले स्वरूप प्राप्त होईल असे यावरून दिसत येत आहे.या ठिकाणी तालुक्यातील व जिल्ह्यातून बौद्ध उपासक व इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने येऊन बौद्ध भिक्षूचे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पदस्पर्शाने पवित्र झाले.