
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): भाजपाचे माजी उपसरपंच दिलीप झामडे (५५) यांनी पो.उपनिरीक्षक अनिल देरकर यांच्या विरुध्द विनाकारण दिलेल्या शिवीगाळ व धमकी प्रकरणी पोलिस अधीक्षक वर्धा यांचे कडे लेखी तक्रार दाखल केली आहे माजी उपसरपंच झामडे(किन्ही) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या ७ एप्रिल रोजी तक्रारदार स्वतःच्या घरासमोरील ग्रा.पं.च्या बेंचवर मोबाईल पाहत बसून असता २ अनोळखी व्यक्ती जवळ येत तुमच्या जवळून कोण पळाले विचारले असता मी त्यांना माहीत नाही असे म्हणालो त्यानंतर पुन्हा ७:३० वाजता दरम्यान ४ अनोळखी व्यक्ती कुणालाही न विचारता माझे घराचे गेट उघडत घर,शौचालय,बाथरूम,कापूस भरलेली खोली मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने पाहिली व आरोपी लपल्याचा आक्षेप घेत सामानाची फेकफाक केली असता त्यावर तक्रारदार यांनी मोबाईल हाती घेत गटबाजीच्या राजकारणाने घराची झडती घेतली काय?असा प्रश्न विचारला असता त्या अनोळखी व्यक्तींनी माझे १० फोटो घे म्हणत दुसऱ्याने मोबाईल हिसकत तुझे नाव सांग मी आष्टीचा ठाणेदार होय?मला तुझ्या सारखे लय भेटतात, तू पाचशे लोकांच्या गावात राहतो म्हणत साल्या,मादरचोदा अशी अश्लील शिवीगाळ करत पोलीस स्टेशनला तुला व तुझ्या कुटुंबाला फरफटत नेवू शकतो तू आरोपीला पळविले आहे दरम्यान मोबाईल परत केला आणि उपस्थिती लोकांसमोर जोरजोराने आवाज काढत माझा अपमान केला त्यावेळेस माझी आई आणि पत्नीने त्यांना याबाबतीत विचारले असता तुम्ही बोलू नका आम्हाला कोणाच्याही घरात घुसण्याचा आदेश आहे आम्ही काय तुमच्या घरातले दागिने लुटले काय? असे म्हणत ४ व्यक्तींनी २० ते २५ मिनिट्स कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता घराची झाडाझडती घेतली सदर चारही व्यक्ती पोलीस गणवेशात नव्हते तसा मी त्यांना ओळखतो त्या बाबतीत ८ एप्रिल रोजी चौकशी केली असता पो.उपनिरीक्षक अनिल देरकर व त्यांच्या सोबत असणाऱ्यांनी प्रक्रिया घडविली आहे त्यामुळे त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या तक्रारीतून केली आहे