
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा युवकांचा सप्ताहतील सहभाग बघून कीर्तनानिमित्य आलेल्या महाराजांनी युवकांसह गावाकऱ्याचे केले कौतुक गावात एकात्मता नांदवायची असेल तर चागले गुण आत्मसात करा असे आपल्या कीर्तनात हभप सतीश शास्त्री महाराज यांनी सांगीतले.मंठा तालुक्यातील
केहाळ वडगाव येथील जागृत हनुमान देवस्थान ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त 06ते 13 एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम श्री रामकथा सप्ताहाचे आयोजन केले आहे .
त्यावेळी कीर्तन प्रसंगी ते बोलत होते. त्यानंतर
हरी जागरास भजन सम्राट पांडुरंग महाराज गोळेगावकर, यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला त्यांचा आवाजातुन त्याचे वडील स्व. ह. भ. प. बंडुबुवा गोळेगाकर यांच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला श्रोत्याचे मनी जिंकली त्यांना साथ ह.भ. प पद्माकर पेवेकर,संगीत विशारद ज्ञानेश्वर महाराज दवणे.सं.वि. महेश महाराज,सं. वि. बळीराम महाराज, मृदंगचार्य मृदंगमनी शाम महाराज श्रावणे, निवृत्ती महाराज वाघमारे आर्गनवादक शंकर बावस्कर तबलावादक धीरज महाराज आढाव टाळवादक नामदेव घुगे,भरतरी देशमुख,पंचक्रोशीतील भजनी
महाराज यासह संत मंडळींचा
पाचही दिवस संगीतमय रामायणनाने वातावरण भक्तिमय होऊन गेले आहे भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.