
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-
बीड/केज –बीआरएसची मराठवाड्यात एन्ट्री झाली असून केजच्या माजी आमदार सौ संगीताताई ठोंबरे यांच्चे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांचाही प्रवेश. के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बीड जिल्ह्यातील मोठे नेते संपर्कात ! अब की बार किसान सरकार नारा देत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस ने महाराष्ट्रात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने नांदेड मार्गे महाराष्ट्रात विस्तार सुरू केला आहे. नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेत त्यांनी नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक आजी माजी, शेतकरी संघटनेच्या – पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रवादी, मनसे, भाजप, शेतकरी संघटना अशा पक्ष व संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत.
नांदेड, परभणीनंतर आता हे लोण बीड जिल्ह्यात देखील पोहचले आहे. केज येथील भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी देखील बीआरएसमध्ये पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. डॉ. विजयप्रकाश ठोंबरे हे राजकारणात सक्रिय आहेत. ते केज येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमनअसून कृषी शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी भाजपकडून माजी आमदार आहेत. त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यापासून ते फारसे सक्रिय नव्हते. त्यांना भाजपकडून सातत्याने डावलण्यात आले. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेत पक्षात प्रवेश केला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.