
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
वाघोली ( ता.11 ) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विष्णूजी शेकोजी सातव विद्यालयाच्या २००४-०५ या शैक्षणिक सालामध्ये इ. दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यास २०० पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व ४० शिक्षक उपस्थित होते. प्रवेशद्वारातून शिक्षकांच्या आगमन होताच सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या व पारंपारिक वाद्यच्या गजरात स्वागत केले. काही माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्राचार्य व शिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात झाले. प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपला अल्पपरिचय या दरम्यान दिला. सन २००४-०५ या शैक्षणिक वर्षात दहावी अ. ब. क. ड. ई. या पाचही तुकड्यात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा सर्वांना त्याच वर्गात त्याच बाकावर बसण्याचा आनंद घेता आला. गुरुवर्याच्या भेटीनंतर सर्व विद्यार्थ्यांचे मन भरून आले होते. मच्छिंद्र सातव व स्वाती मोरे या दोन विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींन सह प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.