
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर : बाराव्या शतकातील पहिल्या जागतिक ( अनुभव मंटप ) संसदेचे जनक, विश्वप्रणेते, समतेचे व स्त्री – मुक्तीचे प्रणेते, कल्याण राज्याचे आदर्श लोकप्रशासक क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन : कार्य आणि विचार हा ऐतिहासिक महाग्रंथ एप्रिल २०२४ मध्ये प्रकाशित होणार आहे. जवळपास प्रस्तुत महाग्रंथाचे काम नव्वद टक्के पूर्ण झालेले आहे, केवळ काहीच दर्जेदार लेखाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला एक सुवर्ण संधी आहे ज्यांनी आजपर्यंत लेख पाठविले नाहीत त्यांच्यासाठी, तरी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगना, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील जेष्ठ लेखक, संशोधक, पत्रकार, वकील, विद्यार्थी व विद्यार्थिनी आदींनी स्वलिखित सकारात्मक लेख टंकलिखित करुन वर्ल्ड फाईल व पिडीयफ फाईल ( ९७६५६३०५९१) व्हाटस अॅप वर ई-मेल आयडीवर दि. १० जून २०२३ पर्यंतच पाठवावेत असे आवाहन महाग्रंथाचे मुख्यसंपादक : युवा अभ्यासक व प्रमुख वक्ते डॉ. उलगडे लक्ष्मण यांनी केले आहेत.