
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब व संस्थेचे सहसचिव ऍड. मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे साहेब यांनी दिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्ताने सामाजिक कार्यात व कामात सतत अग्रेसर राहून विविध उपक्रम हाती घेऊन कंधार व लोहा तालुक्यात विविध व वेगवेगळे कार्यक्रम राबवले आहेत त्याच अनुषंगाने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्था अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भाऊ धोंडगे व संस्था सहसचिव अँड. मुक्तेश्वर भाऊ धोंडगे यांनी संस्थेच्या परंपरेनुसार सामाजिक बांधिलकी जपत सर्व धर्मीय सोहळ्यासाठी धर्मदाय उपायुक्त नांदेड श्री मसने साहेब यांना रोख रक्कम एक लाख रुपये (100000/- ) देऊन सामाजिक बांधिलकीची जोपासना करत सर्वधर्मीय सोहळा व्यवस्थित पार पडावा ही अपेक्षा व्यक्त केली.. . सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड , धर्मदाय संघटन सर्व धर्मीय विवाह सोहळा समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून या सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास तमाम जिल्ह्यातील बंधू भगिनी , मित्रपरिवार , वडीलधाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब व संस्थेचे सहसचिव एँड .मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे साहेब यांनी केले