
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना:- नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांना तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल विष्णू पाचफुले मित्र मंडळाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विष्णू पाचफुले यांच्यासह अविनाश चव्हाण, पावलस निर्मळ, राम भुतेकर, पांडुरंग खैरे, महादेव घेंबड, रमेश सरकटे, विक्रम कुसुंदल, श्री. इघारे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी विष्णू पाचफुले यांनी संदीप ढाकणे यांचा सत्कार केला. ते म्हणाले की, संदीप ढाकणे हे निष्कलंक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असून, त्यांचा आजवरचा कार्यकाळ जनताभिमुख राहिलेला आहे. यापुढेही त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहो, अशी सदिच्छा विष्णू पाचफुले यांनी दिली.