
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर-देश भरा मधे वाहनचालकांच्या शेकडो नाहि तर हजारो संघटना आहेत.परंतु त्यांचे कार्य व विस्तार एका ठरावीक मर्यादे बाहेर गेलेला नाहि.परंतु जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था हि वाहन चालकांची अशी एक संघटना आहे की त्यांच्या संघटनेचे जाळे अल्पावधी मधेच संपूर्ण देशभर विणले गेले आहे. त्या मागील मुख्य कारण मणजे त्या संघटनेच्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्या मुळे.
पूर्वी जर एखादे वाहन राज्या मधे किंवा पर राज्या मधे नादुरूस्त झाले तर स्वतः ड्रायव्हरला गाडी सोडून गैरेज शोधावे लागत आसे,जर गाडी अवेळी ब्रेक डाउन झालेली आसेल तर प्रवाशांना ती गाडी सोडून अन्य वाहनाने जाण्या शिवाय दूसरा पर्याय रहात नसे.जर बाहेर गावी एखाद्या वाहनाचा दुर्दैवी आपघात झाला तर आपघात ग्रस्तां जवळ त्यांच्या जवळचे आसे तात्काळ कोणी पोहचत नसे.परंतु जय संघर्ष वाहन चालक संस्थेच्या निर्मिती पासून वाहन कुठल्या हि वेळी व कुठल्याही राज्या मधे नादुरूस्त होऊ द्या जय संघर्ष संस्थेच्या व्हाट्सअप ग्रुपवर पोस्ट पडताच तात्काळ स्थानीक सदस्य येऊन हवी ती मदत करतात.संघटनेच्या या अभिनव कामगीरी मुळे प्रवासातील प्रवाशांना देखील ऐन वेळेवर उद्भवलेल्या संकटाला तोंड देतांना होणारा त्रास कमी झालेला आहे. या कारणाने अल्पावधी मधेच संस्था वाहन क्षेत्रा मधे कार्य करणार्या व्यवसायीका मधे व प्रवाशां मधे लोकप्रिय झालेली आहे.
सदरच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हाळनोर हे आसून ते छत्रपती संभाजीनगरचे रहिवाशी आहेत.त्यांच्या मदतीच्या संकल्पने सोबतच वाहन चालकांच्या विविध मागण्या संदर्भात सरकारशी विवेदन,आंदोलन,मोर्चे व उपोषण आशा लोकशाहि मार्गाने मागील अनेक वर्षा पासून लढा देत आलेले आहेत.परंतु त्यांच्या लढ्याला आता पर्यंत अपेक्षित यश न मीळाल्या मुळे किंवा महाराष्ट्र शासना कडून आश्वासनाच्या पलिकडे काहिच न मीळाल्या मुळे त्यांनी तेलंगाना राज्यातील भारत राज्य समिती या पक्षा मधे येत्या 24 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आ.श्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थिति मधे हजारो चालकासह श्री संजय हाळनोर साहेब यांचा जाहिर पक्ष प्रवेश होणार आहे व सदरच्या पक्ष प्रवेशा वेळी लातुर जिल्ह्या मधून हजारोच्या संख्येने वाहन चालक सामील होणार आहेत अशी माहिती संघटनेचे लातुर अवजड वाहतूकीचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रवीण गायकवाड व खाजगी बस वाहतूक चालक संघटनेचे लक्झरी बसेस प्रदेश अध्यक्ष श्री योगेश शिंदे व लातूर जिल्हाध्यक्ष नय्युम खाजामिय्याॅ शेख व रमेश राठोड सोशल मिडीया उपाध्यक्ष यांनी कळवले आहे.