दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त मौ. सोनखेड ता. लोहा. जि. नांदेड. येथे . श्री. गुरुदत्त प्रतिष्ठाण नांदेड संचलित नांदेड रूरल डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नांदेड व सार्वजनिक भीमजंती मंडळ सोनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दंत रोग निदान शिबिराचे आयोजन केले यावेळी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती श्री. शिवाजी महाराज व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराला नांदेड रुरल डेंटल कॉलेजच्या सहायक प्राध्यपिका डॉ. सुषमा बेलखेडे, डॉ. सुप्रिया पालेकर, डॉ. ललित पालीवाल, डॉ. प्रियंका श्रीरामवार यासह सोनखेड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ऊत्तम डोईबळे, कॉन्स्टेबल देवकत्ते मॅडम, कॉन्स्टेबल फड सर. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक एस. पी. गच्चे भीमजयंती जयंती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब खिल्लारे, उपाध्यक्ष शंकर धुतराज, सचिव रतन भोरगे, कोषाध्यक्ष तुकाराम खिल्लारे प्रसिद्धी प्रमुख अमोल खिल्लारे, यासह अनेकांची उपस्थिती होती. दंत शिबिरामध्ये सोनखेड व परिसरातील २०० ते ३०० गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
भविष्यातही असे अनेक सामाजिक उपक्रम राबण्याची संकल्पना आहे अशी माहिती जयंती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब खिल्लारे यांच्या वतीने देण्यात आली .
