
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:– तात्कालिन नगर पालिका मालकीच्या लातूर शहरा लागत जकात नाक्याच्या जागा लातूर शहर महानगरपालिकेने ताब्यात घेऊन त्यात्या परिसरातील स्वछता निरीक्षक व वसुली लिपिक यांच्या कार्यालयाकरिता सदरील जागेचा वापर करावा या मुळे नागरिक स्थानिक नागरी समस्या या कार्यालयात सोडवल्या जातील याची दखल घेऊन तात्काळ महानगरपालिका मालकीच्या जकात नाक्याच्या जागा ताब्यात घेण्याच्या मागणीचे निवेदन लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या वतीने लातूर शहर महानगरपालिका आयुक्त/उपायुक्त वीणा पवार यांच्या कडे करण्यात आली या वेळी दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे,राजकुमार कसबे,नागनाथअण्णा नांनावडे, किरण कांबळे,भगवेश्वर धनगर यांची उपस्थिती होती