
दैनिक चालु वार्ता भुम प्रतिनिधि-नवनाथ यादव
भू म:-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भूम बस आगारामध्ये राष्ट्रीय कामगार कार्यकारणी ची बैठक आयोजित करण्यात आली होती.राष्ट्रीय कामगार सेना संपर्क सचिव धाराशिव भगत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अध्यक्ष – एम. ए. ऊंबरे,सचिव – पोपट पांडुरंग दळवी , उपाध्यक्ष- श्रीखंड पवार, सहसचिव – राहुल कोरडे , संघटक – सचिव बी.एस. सरकाळे, खजिनदार – एस.के. कुंभार , विधी सल्लागार – एस के शेट्टी , संघटक सचिव – पोळ एस.व्ही., उपकार्याध्यक्ष – थोरात ए. जे यांची एकमताने निवड करण्यात आली.तर सदस्य म्हणून डांगे. डी. व्ही, मारुती उपरे, रवी जगताप, नितीन हुंबे, बी.एम मस्के , जी एम परदेशी, एन. सी गलांडे, सहाय्यक एम एन काळे, सहाय्यक डी.बी. हावळे, पवार. के.पी, चालक बी.एल.कानडे यांची निवड करण्यात आली.यावेळी भूम आगरामधील कर्मचारी उपस्थित होते.