
दैनिक चालु वार्ता भूम प्रतिनिधि-नवनाथ यादव
भू म:-संपूर्ण महाराष्ट्रात लाखो दर्शकांचे नंबर वन मराठी वृत्तवाहिनी म्हणून एन. टी. व्ही मराठी न्यूज चॅनल कडे पाहिले जाते. राज्याच्या प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर या मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून चालू घडामोडी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आधी चा वृत्तांत आपल्या सडेतोड बातम्यांच्या माध्यमातून प्रसारण केले जाते .या बातम्याची दखल आनंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी घेतली व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारां ची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी दिला जातो यावर्षी हा पुरस्कार एन टीव्ही न्यूज मराठी या वर्तवाहिनीचे भूम प्रतिनिधी गौस शेख यांना अनंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला. पुरस्काराचा मान भूम ला मिळाल्याबद्दल मित्र परिवाराच्यावतीने शुभेच्छा देण्यात येत आहे.