
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनीधी-विष्णु मोहन पोले
हाडोळती- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या (फेब्रुवारी 2023) हाडोळती तालुका अहमदपूर येथील दयानंद विद्यालय या शाळेतील चार विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. त्यात इ.8वी चे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक(पात्र), तर इयत्ता 5वी चा एक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक(पात्र) झाला आहे .इयत्ता 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेले पुढील प्रमाणे विद्यार्थी आहेत.
(1) चौकटे आदित्य भरत
(2) कोटलवार सक्षम नरहरी
(3)पन्हाळे श्रेया धनंजय, तर इयत्ता 5 वी मध्ये
(1)गोरे प्रथमेश किरण हाविद्यार्थी पात्र झाला आहे.त्यामुळे सदरील विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रा. पी.टी. पवार सर ,सचिव डॉ. निलेश भैय्या पवार , प्राचार्य जोगदंड आय. एम.,माजी प्राचार्य व्यंकटराव मुळके ,पर्यवेक्षक कोटसूळवार ए.पी. , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी यांनी अभिनंदन केले आहे.