
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
भारत देशाला ला पदक मिळवून देत तिरंग्या ला गर्वाने फडकविणा-या मुलींवर केंद्र सरकार अन्याय करीत असल्याची भावना एन.एस.यु.आय ने व्यक्त केली आहे.
काॅंग्रेस पक्षाचे विद्यार्थी संघटन असलेल्या एन.एस.यु.आय ने पीड़ित पहलवान महिलेला न्याय देण्यासाठी ठामपणे सोबत असल्याचे जाहीर करीत बेटी बचाओ चा नारा देणा-या मोदीजींची सरकार यौन शोषणाचा आरोप असणाऱ्या ब्रिजभुषन ला कां वाचवित आहे असा प्रश्न एन.एस.यु.आय कडून निर्माण केल्या जात आहे ?
चंद्रपुर जिल्हा एन.एस.यु.आय च्या वतीने राष्ट्रीय सचिव रोशनलाल बिट्टू यांच्या मार्गदर्शनाखाली व जिलाध्यक्ष शफाक शेख यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील वेगवेगळ्या विद्यालयाच्या बाहेर चैंपियसना न्याय मिळवून देण्यासाठी अलिकडेच हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले होते.
आपल्या या हक़्काच्या लढाईत म्हणजे हस्ताक्षर मोहिमेत संघटनेचे पदाधिकारी हिमांशु आवळे, प्रतीक नल्लाला, याकुब पठाण, उमेश बरडे, प्रणीत तोड़े, योगेश, संजू ग्वालवंशी यांच्या सह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती एन.एस.यु.आय च्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.