
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे.
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील घटना संजय अंकुश पवार (३३)यांनी शुक्रवार दि.१२/०५/२०२३ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान स्वतःच्या राहत्या घरी घराचा दारावाजा आतून बंद करून किरकोळ कौटुंबिक वादाच्या करणावरून दारूच्या नशेत धुंद राहुन पत्नी संगीता संजय पवार (वय २९) यांच्या डोक्यावर लोखंडी पाहरीने वार करून डोक्यावर जबर मार लागल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.संजय अंकुश पवार यांनी पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहुन भीती पोटी पळ काढून आनंदवाडी रोडवरील दहिफळ खंदारे शिवारातील क्रेशर मशीन जवळ शेतातील आंब्याच्या झाडाला दोरखंडाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली .सदरील दाम्पत्यास दोन मुली एक मुलगा असुन तिन्ही मुले लहान असुन आता त्यांचे काय होईल म्हणुन परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना पोलीस ठाणे मंठा यांना समजताच हजर झाले व तेथील बघ्याची गर्दी हटवून दोघांचा मृत्यू झाल्याचे पाहून शवविच्छेदनासाठी रूग्णालय मंठा येथे हलविण्यात आले असल्याचे समजले पुढील तपास .मा.पोनि. देशमुख करीत आहेत