
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव सुर्जी शहरातील विठ्ठल मंदिर जवळील श्रीकृष्ण नगर रोडवर नालीचे पाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.येथील नालीचे बांधकाम निविदा एक वर्षापासून निघालेली असून काम मात्र प्रलंबित आहे.आज किरकोळ स्वरूपात नगरपरिषद आरोग्य विभागाने साचलेल्या पाण्याचे तात्पुरती विल्हेवाट लावण्यात आली.परंतु रोगराईच्या दृष्टिकोनातून कायमस्वरूपी नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
पावसाळ्यात अंजनगाव सुर्जी शहरातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते.अशी स्थिती निर्माण झाली ते श्रीकृष्ण नगर येथे या ठिकाणी नगरपरिषद प्रशासनाने बांधलेल्या एका बाजूची नाली ब्लॉक झाली असून दुसऱ्या बाजूच्या नालीचे व्यवस्थापन नसल्यामुळे ब्लॉक झालेल्या नालीचे पाणी आणि साचलेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या प्लॉटमध्ये जात असून त्यामुळे त्यांच्या आर्थिक तसेच शारीरिक नुकसान होत आहे.त्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक ठिकाणसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.