
दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): आज कर्नाटक राज्याचा निवडणूक निकाल लागला असून त्यात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे कर्नाटक विधानसभा सदस्य संख्या २२४ आहे त्यापैकी १३५ जागे पर्यंत काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे त्याबाबतीत दै.चालू वार्ता ने प्रतिक्रिया घेतली असता काँग्रेस गटनेता नगरसेवक राहुल लाड यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविताना जनता महागाई आणि बेरोजगारीने होरपळून निघाली आहे शिवाय वाढती धर्मांधता याविरोधात लोकांनी मतदान केले असून लोकांनी लोकशाहीच्या बाजूने मतदान केले आहे अशी प्रतिक्रिया दिली तर भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य माजी नगरसेवक अशोक विजयकर यांची प्रतिक्रिया घेतली असता कर्नाटक राज्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला असून तेथील जनता दर पंचवार्षिक निवडणुकीत मध्ये सत्ताबदल करत असते त्यामुळे कर्नाटकच्या निकालात फार मोठ आश्चर्य नाही असे म्हणाले याबाबतीत फेरफटका मारला असता काँग्रेस कार्यकर्त्यात आत्मविश्वास द्विगुणित झाल्याची भावना दिसत होती येत्या २०२४ लोकसभा निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचा कर्नाटक राज्याचा निकाल एक पुरावाच असल्याचे मत ग्रा.पं.धाडी येथील काँग्रेस पक्षाचे सरपंच दिलीप भाकरे यांनी दिली