
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वडोद तांगडा-समाधान कळम
वडोद तांगडा गावातील तरूण मुलांनी दारूबंदीचा ठराव देखील घेतला आणि ग्रामपंचायत ने दारूबंदीचा ठराव देखिल महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिला आहेत.त्याचे पण भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, शेलुद हिसोडा पिंपळगाव रें. वरूड बु. इत्यादी अनेक गावाकडे दुर्लक्ष केले जातेय, पोलीसांना पत्र देखील काढले होते परंतु आजतगायत मौजे वडोद तांगडा गावातील अवैद्य दारू विक्री बंद झालेली नाही , अवैधरित्या गावठी, देशी, विदेशी दारू बाळगणे व विक्री करणे कायद्याने सर्वत्र बंदी असताना वडोद तांगडा गावात राजरोसपणे तिची विक्री होत आहे. यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत चालली आहेत. तसेच दारूमुळे जातीधर्मात समाजात तेढ वादविवाद होण्याचा प्रयत्न देखील होत आहे. गावातील अवैध दारु विक्री पूर्णपणे बंद झाली पाहिजेत अशी मागणी युवामंच तरूण ग्रुप च्या वतीने होत आहेत. याबाबत या विक्रेत्यांना ग्रामपंचायतीने वारंवार सूचना विनंती केली आहे .अवैध दारूविक्री मुळे वडोद तांगडा गावात आत्महत्या चे प्रमाण देखील वाढले आहेत, अनेक महिला भगिनींना दारू पिऊन आलेल्या आपल्या तरूण मुलाचा व आपल्या पतीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या अवैद्य दारू विक्रीस पोलीसांचा अभय आहे की अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे असे असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात गावातील अवैध दारू विक्री लवकरात लवकर बंद करून पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवण्याची गरज आहे तसेच यावर प्रशासनाने अंकुश ठेवायला हवा.